जर्मनविंग्ज फ्लाइट ९५२५

जर्मनविंग्ज फ्लाइट ९५२५ हे जर्मनविंग्जचे स्पेनच्या बार्सिलोनाहून जर्मनीच्या ड्युसेलडॉर्फकडे जाणारे उड्डाण होते. २४ मे २०१५ रोजी एअरबस ए३२०-२०० प्रकारचे हे विमान आग्नेय फ्रान्समधील नीस शहराच्या १०० किमी वायव्येस आल्प्स पर्वतरांगेतील एका गावाजवळ कोसळले. ह्या दुर्घटनेमध्ये विमानामधील सर्व १४४ प्रवासी व ६ कर्मचारी ठार झाले.

जर्मनविंग्ज फ्लाइट ९५२५
D-AIPX ह्या एअरबस ए३२० बनावटीच्या अपघातग्रस्त विमानाचे बार्सिलोना विमानतळावरून उड्डाण करताना मे २०१४ मधील चित्र
अपघात सारांश
तारीख२४ मार्च २०१५
स्थळआल्प-दा-ऑत-प्रोव्हॉंस, फ्रान्स
44°16′48″N 6°26′20″E / 44.280083°N 6.438750°E / 44.280083; 6.438750
प्रवासी१४४
कर्मचारी
जखमी
मृत्यू१५० (सर्व)
बचावले
विमान प्रकारएअरबस ए३२०-२००
वाहतूक कंपनीजर्मनविंग्ज
विमानाचा शेपूटक्रमांकडी-एआयपीएक्स
पासूनबार्सिलोना–एल प्रात विमानतळ, बार्सिलोना, स्पेन
शेवटड्युसेलडॉर्फ विमानतळ, ड्युसेलडॉर्फ, जर्मनी
उड्डाणाचा मार्ग
अपघाताचे स्थान is located in फ्रान्स
अपघाताचे स्थान
अपघाताचे स्थान
अपघाताचे फ्रान्समधील स्थान

मध्य युरोपीय प्रमाणवेळेनुसार १०:०० वाजता ह्या विमानाने बार्सिलोनाहून उड्डाण केले व ते ११:३९ वाजता ड्युसेलडॉर्फमध्ये पोचणे अपेक्षित होते. १०:३१ वाजता कोणत्याही परवानगीविना किंवा संदेशाविना हे विमान ३८,००० फूट उंचीवरून खाली येऊ लागले. वैमानिकांसोबत संपर्काचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

अपघातग्रस्त व्यक्तींचे राष्ट्रीयत्व

राष्ट्रीयत्वानुसार विमानामधील व्यक्ती
देशसंख्या
 जर्मनी72[१]
 स्पेन51[२]
 आर्जेन्टिना3[३]
 कझाकस्तान3[४]
 युनायटेड किंग्डम3[५]
 अमेरिका3[६]
 ऑस्ट्रेलिया2[७]
 कोलंबिया2[८]
 इराण2[९]
 मेक्सिको2[१०]
 मोरोक्को2[११]
 व्हेनेझुएला2[१२]
 बेल्जियम1[१३]
 चिली1[१४]
 डेन्मार्क1[१५]
 इस्रायल1[१६]
 नेदरलँड्स1[१७]
 पोलंड1[१८]
 तुर्कस्तान1[१९]
एकूण150

संदर्भ आणि नोंदी


साचा:इ.स. २०१५मधील विमान अपघातांची यादी