२०१४ हिवाळी ऑलिंपिक

२०१४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची २२वी आवृत्ती आहे. ही स्पर्धा ते फेब्रुवारी २३ दरम्यान रशिया देशाच्या क्रास्नोदर क्रायमधील सोत्शी ह्या शहरामध्ये खेळवली जात आहे.

२०१४ हिवाळी ऑलिंपिक
XXII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
२०१२ च्या सोत्शी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
२०१२ च्या सोत्शी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचा अधिकृत लोगो
यजमान शहरसोत्शी
रशिया ध्वज रशिया


सहभागी देश८८
सहभागी खेळाडू२,८०० (अंदाजे)
स्पर्धा९८, १५ खेळात
समारंभ
उद्घाटनफेब्रुवारी ७


सांगताफेब्रुवारी २३
अधिकृत उद्घाटकव्लादिमिर पुतिन
खेळाडूंची प्रतिज्ञारुस्लान झाकारोव्ह
मैदानफिश्त ऑलिंपिक स्टेडियम


◄◄ २०१० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २०१८ ►►
सोत्शी is located in युरोपियन रशिया
सोत्शी
सोत्शी
सोत्शीचे रशियामधील स्थान
ह्या स्पर्धेप्रित्यर्थ बनवण्यात आलेली १०० रूबलची नोट

ह्या स्पर्धेसाठी सोत्शीची निवड ४ जुलै २००७ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ग्वातेमाला सिटी येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली. यजमानपदासाठी ऑस्ट्रियामधील जाल्त्सबुर्गदक्षिण कोरियामधील प्याँगचँग ही इतर शहरे उत्सुक होती. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियामध्ये खेळवली जाणारी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे.

ह्या स्पर्धेसाठी रशियामधील काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर संपूर्णपणे नवीन क्रीडा संकूल बांधले गेले आहे. ह्या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा (रेल्वे, महामार्ग, विमानतळ) सुधारण्यासाठी तसेच अनेक सोयी नव्याने बांधण्यासाठी एकूण ५१ अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च आला आहे. सोत्शी २०१४ ही आजवरच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक क्रीडा स्पर्धा आहे.

खेळ

२०१४ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये खालील १५ हिवाळी खेळांचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक खेळापुढील कंसांत त्या खेळाचे प्रकार दर्शवले आहेत.

सहभागी देश

२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी एकूण ८८ देशांनी पात्रता मिळवली.

सहभागी देश

२०१० मध्ये सहभागी असलेले परंतु २०१४ मध्ये सहभागी नसलेले देश.२०१४ मध्ये सहभागी असलेले परंतु २०१० मध्ये सहभागी नसलेले देश.
कोलंबिया
इथियोपिया
घाना
उत्तर कोरिया
सेनेगाल
दक्षिण आफ्रिका
ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह
डॉमिनिका
लक्झेंबर्ग
माल्टा
पेराग्वे
फिलिपिन्स
थायलंड
पूर्व तिमोर
टोगो
टोंगा
व्हेनेझुएला
यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह
झिम्बाब्वे

a भारतीय ऑलिंपिक संघाला डिसेंबर २०१२ पासून निलंबित केले गेले असल्यामुळे भारत देशाचे उत्सुक खेळाडू ऑलिंपिक ध्वज वापरून वैयक्तिकपणे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.[१] ११ फेब्रुवारी रोजी आय.ओ.ए.चे निलंबन मागे घेतले गेले व भारतीय खेळाडूंना भारताचा ध्वज वापरण्यास परवानगी देण्यात आली.[२]

पदक तक्ता

Key

   *   यजमान संघ

 क्रम NOCसुवर्णरौप्यकांस्यएकूण
1  रशिया *1311933
2  नॉर्वे 1151026
3  कॅनडा 1010525
4  अमेरिका 971228
5  नेदरलँड्स 87924
6  जर्मनी 86519
7  स्वित्झर्लंड 63211
8  बेलारूस 5016
9  ऑस्ट्रिया 48517
10  फ्रान्स 44715
11  पोलंड 4116
12  चीन 3429
13  दक्षिण कोरिया 3328
14  स्वीडन 27615
15  चेक प्रजासत्ताक 2428
16  स्लोव्हेनिया 2248
17  जपान 1438
18  फिनलंड 1315
19  युनायटेड किंग्डम 1124
20  युक्रेन 1012
21  स्लोव्हाकिया 1001
22  इटली 0268
23  लात्व्हिया 0224
24  ऑस्ट्रेलिया 0213
25  क्रोएशिया 0101
26  कझाकस्तान 0011
एकूण999799295

संदर्भयादी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: